World Cup 2023 Final IND vs AUS, Rape Threats To Travis Head Wife And Daughter : विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयात ट्रॅव्हिस हेडने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 137 धावांची खेळी केली.
आता अनेक क्रिकेट चाहते ट्रॅव्हिस हेडची पत्नी जेसिका डेव्हिस आणि त्यांच्या मुलीला शिवीगाळ करताना आणि बलात्काराची धमकी देताना दिसतात. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला एकतर्फी सामना जिंकून देण्यामध्ये हेडने महत्वपूर्ण योगदान दिले होते.
सोशल मीडियावर काही छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये नाराज चाहते ट्रॅव्हिस हेडची पत्नी जेसिका डेव्हिसला इंस्टाग्राम पोस्टच्या कमेंटमध्ये शिवीगाळ करत आहेत. काही लोकांनी तर जेसिकाच्या चित्रांवर अतिशय अश्लील आणि असभ्य टिप्पण्या केल्या आहेत, ज्यात बलात्काराच्या (Rape) धमक्याही होत्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या एक वर्षाच्या मुलीलाही अनेकांनी बलात्काराच्या (Rape) धमक्या दिल्या.
Absolutely vile and shocking. Indian cricket fans giving r@pe threats to the wife and daughter of Travis Head after the WC win.
His daughter is only 1 year old 🥲 pic.twitter.com/livmWjlioH
— Singh (@APSvasii) November 19, 2023
ट्रॅव्हिस हेडच्या शतकामुळे फिरला सामना…
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेल्या रविवारी (19 नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी 240 धावांत गुंडाळले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 6.6 षटकांत 47 धावांवर 3 विकेट गमावल्या. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी चौथ्या विकेटसाठी 215 चेंडूत 192 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय एकतर्फी ठरला. या काळात हेडने आक्रमक फलंदाजी केली, तर लॅबुशेन संथ गतीने डावाची धुरा सांभाळताना दिसला. हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 137 धावा केल्या होत्या. याशिवाय लॅबुशेनने 110 चेंडूत 4 चौकारांसह 58 धावांची नाबाद खेळी खेळली होती.