World Cup 2023 Points Table : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 25व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. बेंगळुरूच्या मैदानावर श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात 157 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने 2 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
या सामन्यात श्रीलंकेच्या मोठ्या विजयानंतर विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. या विजयासह श्रीलंकेने विश्वचषक 2023च्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ 2023 च्या विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे.
वास्तविक, इंग्लंडविरुद्ध (ENG vs SL) नेत्रदीपक विजयानंतर, श्रीलंकेच्या संघाला विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत फायदा झाला. श्रीलंकेचा संघ पाकिस्तान संघाच्या स्थानावर म्हणजेच पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे पाकिस्तान संघाचे नुकसान झाले. पाकिस्तान संघ सहाव्या स्थानावर घसरला आहे.
या पराभवानंतर इंग्लंडचा संघ गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. इंग्लिश संघाच्या खात्यात 5 सामन्यांनंतर फक्त एक विजय आणि 4 पराभव आहेत. यादरम्यान त्याचे 2 गुण आहेत. जर इंग्लंडला उपांत्य फेरी गाठायची असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील, परंतु तरीही त्यांना अंतिम 4 गाठणे फार कठीण आहे.