Madhuri Dixit । बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित पुढील येत्या लोकसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. राजकीय वर्तुळात माधुरी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांच्या बऱ्याच काळापासून संपर्कात आहे. असल्याचेही म्हटले जात आहे. याआधी पुण्यातूनही ते निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
माधुरी उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, ही जागा शिवसेनेच्या खात्यात असून, शिंदे गटात असलेले गजानन कीर्तिकर येथून खासदार आहेत. मात्र, यावेळीही त्यांची प्रकृती ठीक नाही. अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
तर काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान माधुरी दीक्षित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिसल्या.इतकंच नाही तर भाजप नेते आशिष शेलारही तिथे उपस्थित होते. त्यानंतर माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण आता खुद्द माधुरी दीक्षित हिनेच याबाबतचे मौन सोडत मोठं विधान केलं आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या माधुरीने पत्रकारांशी संवाद साधलाच आणि राजकारणाबद्दलही भाष्य केलं.
Madhuri Dixit । नेमकं काय म्हणाली माधुरी दीक्षित
तुम्हाला राजकारण आवडतं का ? असा प्रश्न मला अनेक वेळा विचारला जातो. पण खरं सांगायचं तर मी एक कलाकार आहे. माझी जी कला आहे, त्याच्यात माझा चांगला जम बसला आहे. त्यात मला रस आहे. राजकारण मला माहित नाही. राजकारण माझी वृत्ती नाही किंवा ते माझं क्षेत्र नाही, असं माधुरी दीक्षितने स्पष्ट केलं. भाजपकडून ऑफर आहे का ? यावर माधुरीने हसत उत्तर दिल ती म्हणाली, ‘ते मी तुम्हाला का सांगू ? असा उलट सवाल विचारत माधुरीने तो सवाल अलगद टाळला. आणि राजकारण प्रवेशाबाबतचा हा सस्पेन्स (पुन्हा) कायम ठेवला.’ त्यामुळे पुन्हा एकदा माधुरी राजकारणात येणार का असा प्रश्न चाहत्यांनी सोशल मीडियावर विचारायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा
जुनं तेच सोनं ! जुन्या चपला आणि बुटांपासून दोन तरुणांनी उभारला ३ ‘कोटींचा व्यवसाय’