मेलबर्न – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून पहिल्या कसोटीने प्रारंभ होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांचा माजी कसोटीपटू शेन वॉटसन याने एक सल्ला दिला आहे. भारताची फिरकी गोलंदाजी संयमाने खेळण्याचा प्रयत्न केला तर अपयशी ठराल, त्यापेक्षा आक्रमक फलंदाजीचे धोरण ठेवा म्हणजे त्यांची दीशा व टप्पा चुकेल, असे वॉटसनने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या अन्य कोणत्याही क्रिकेटपटूपेक्षा वॉटसनला आयपीएळ स्पर्धेमुळे भारतात खेळण्याचा अनुभऴ जास्त असल्याने त्याचा सल्ला महत्वाचा ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीची चिंता करत अशले तरीही त्याच्यापेक्षा रवींद्र जडेजा जास्त धोकादायक ठरु शकतो. जडेजा कायमच कोणत्याही फलंदाजाला यष्टीवरच गोलंदाजी करतो. त्यातही चेंडूचा वेग, टप्पा व दीशा सातत्याने बदलत असतो. तो अत्यंत हुशार गोलंदाज आहे. फलंदाज कुठे कमी पडत आहे हे तो अन्य गोलंदाजांपेक्षा जास्त लवकर ओळखतो व त्यानूसार गोलंदाजी करतो, त्यामुळे त्याची गोलंदाजी संयमाने खेळायला गेले तर तो तूमच्यावर वर्चस्व राखेल, असा इशाराही वॉटसनने दिला आहे.
#AsiaCup । आशिया करंडकाचे भविष्यच टांगणीला; बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादाचे ग्रहण
जडेजा गोलंदाजी करत असेल तर तूमचे फुटवर्क योग्यच असले पाहीजे. तसेच विनाकारण घाबरण्यापेक्षा त्याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला तरच तो दडपणाखाली येइल. अश्विन अचुक आहेच पण या मालिकेत जडेजा जास्त धोकादायक ठरेल. एकतर पाच महिन्यांच्या मोठ्या कालखंडानंतर तो संघात पुनरागमन करत आहे त्यामुळे जास्तीत जास्त सरस कामगिरीसाठी तो सज्ज असेल. त्याने स्लोअर वन, फास्टर वन, रॉंग वन, फ्लिपर किंवा वे आऊट साइड ऑफ ऑफ स्टम्प गोलंदाजी केली तर त्यावर आक्रमक फटकेबाजी हेच योग्य उत्तर असेल. तो ऍक्रॉस गोलंदाजी करत असेल तर स्वीपचा फटका त्यावर जालीम उपाय ठरेल, असेही वॉटसनने सांगितले आहे.
स्मिथ, ख्वाजा व वॉर्नर लक्षवेधी
या मालिकेत ऑस्ट्रेलियाची सर्व मदार प्रामुख्याने स्टिव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा व डेव्हीड वॉर्नरवरच असेल. त्यांना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे तेथिल खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची तसेच कोणता गोलंदाज कमी पडत आहे ते ओळखून त्यालाच लक्ष्य करायचे याचे भान या तीन फलंदाजांना जास्त आहे, असेही वॉटसनने म्हटले आहे.