मुंबई – छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाला. या राड्यानंतर एकमेकांवर दगडफेक, हाणामारी आणि पोलिसांसह इतर वाहनांच्या जाळपोळ करण्यात आली. या घटनेत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. संभाजीनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. यावरून आता राजकीय नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.
तसंच, जळगावसह मुंबईतील मालाड मालवणी येथे दंगली घडत आहेत. असं असतानाच याप्रकरणी ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यता आले असून काहींना ताब्यातही घेण्यात आलं आहे. राज्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असल्याने यातून मार्ग काढून शांतता टिकवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करायला हवा, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीयमंत्री गडकरी
तसेच जातीय सलोखा ठेवून मार्ग काढण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, कोणीही जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बळी पडू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
राज्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असल्याने यातून मार्ग काढून शांतता टिकवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करायला हवा, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. @AjitPawarSpeaks यांनी व्यक्त केले. pic.twitter.com/cyxz8nRVdG
— NCP (@NCPspeaks) March 31, 2023
आपल्या महापुरुषांची शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपली वागणूक ठरवावी, असे देखील ते म्हणाले.